अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:51 IST2019-11-18T14:51:34+5:302019-11-18T14:51:53+5:30
दिंडोरी : नाशिक-कळवण मार्गावरील वलखेड फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात वरखेडा येथील युवक जागीच ठार झाला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक ठार
दिंडोरी : नाशिक-कळवण मार्गावरील वलखेड फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात वरखेडा येथील युवक जागीच ठार झाला आहे. याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी रात्रीच्या सुमारास वलखेड फाटा येथे अज्ञात वाहनाची मोटर सायकलला धडक लागून बापू मनोहर गरु ड (३९) हा युवक जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेने वरखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिस निरिक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हावलदार तुळशीराम जाधव , यशवंत भोये करीत आहेत.