येवला बसस्थानक परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:28 IST2021-02-13T23:46:35+5:302021-02-14T00:28:52+5:30

येवला : शहर बसस्थानक परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. वाढलेली थंडी व उपाशीपोटी राहिल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Unidentified Isma dies in Yeola bus stand area | येवला बसस्थानक परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू

येवला बसस्थानक परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू

ठळक मुद्देयेवला शहर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

येवला : शहर बसस्थानक परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. वाढलेली थंडी व उपाशीपोटी राहिल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शनिवारी (दि.१३) येवला शहर बसस्थानक परिसरात सकाळी ७ च्या सुमारास नवीन बांधकाम सुरू असलेल्या शेवटच्या प्लॅटफॉर्मवर एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. याची माहिती वाहतूक नियंत्रक संजय धीवर यांनी पोलिसांना दिली. येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या इसमाबद्दल कोणालाही माहिती असल्यास येवला शहर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Unidentified Isma dies in Yeola bus stand area