दिंडोरी टमाट्याच्या पिकावर अज्ञात रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 15:44 IST2018-08-31T15:43:50+5:302018-08-31T15:44:11+5:30
दिंडोरी - दिंडोरी तालुक्यातील खतवङ परिसरातील बळीराजाच्या टमाट्याच्या पिकावर अज्ञात रोग आल्याने,पीक कोमजू लागल्याने, शेतकरी वर्ग धास्तावले आहेत.

दिंडोरी टमाट्याच्या पिकावर अज्ञात रोग
ठळक मुद्दे.भाऊसाहेब खुर्दळ,एकनाथ खुर्दळ यांची देखील टमाटे कोमजली असल्याने, खतवङ परिसरातील बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दिंडोरी - दिंडोरी तालुक्यातील खतवङ परिसरातील बळीराजाच्या टमाट्याच्या पिकावर अज्ञात रोग आल्याने,पीक कोमजू लागल्याने, शेतकरी वर्ग धास्तावले आहेत.
खतवङ परिसरात मोठ्या प्रमाणात टमाट्याचे पीक घेतले जाते,दर्जेदार पीक घेण्यासाठी महागडी औषधे फवारणी करून,आज पावतो मोठ्या प्रमाणात चाळी ते पन्नास हजार रु पये खर्च करून, मेहनतीने कमावलेले पीक कोमजल्याने , राजू कतोरे ,सुभाष हिरे,यांनी फळावर आलेली टमाटा पीक मुळासकट काढून टाकले आहे.भाऊसाहेब खुर्दळ,एकनाथ खुर्दळ यांची देखील टमाटे कोमजली असल्याने, खतवङ परिसरातील बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.