सिन्नर-शिर्डी रस्त्यावर बेवारस इसमाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:00 IST2019-05-05T18:00:21+5:302019-05-05T18:00:43+5:30

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यालगत तालुक्यातील कुंदेवाडी शिवारात शनिवार (दि. ४) रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

An unidentified body was found on the Sinnar-Shirdi road | सिन्नर-शिर्डी रस्त्यावर बेवारस इसमाचा मृतदेह आढळला

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर बेवारस इसमाचा मृतदेह आढळला

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यालगत तालुक्यातील कुंदेवाडी शिवारात शनिवार (दि. ४) रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर-शिर्डी रोडवरील हॉटेल पुरोहित राजस्थान ढाब्याजवळील रस्त्यालगत असणाऱ्या नालीत अनोळखी पुरूष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. त्याच्या अंगात राखाडी रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे. उंची अंदाजे पाच फूट व रंगाने निमगोरा असे वर्णन असून काही माहिती असल्यास सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एम. धुमाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: An unidentified body was found on the Sinnar-Shirdi road