शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:23 IST

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आलेले ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे ११ सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध गड-किल्ल्यांवरील अवघड वाटा सर करणारे अभ्यासू गिर्यारोहक अरुण सावंत यांचा डोंगरदºयाच्या कुशीतच अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी (दि. १९) आढळून आला.

नाशिक : हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आलेले ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे ११ सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध गड-किल्ल्यांवरील अवघड वाटा सर करणारे अभ्यासू गिर्यारोहक अरुण सावंत यांचा डोंगरदºयाच्या कुशीतच अपघातीमृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी (दि. १९) आढळून आला. सावंत हे तीस गिर्यारोहकांच्या गु्रपला घेऊन हरिश्चंद्रगडावर शनिवारी रॅपलिंगकरिता पोहचले होते.रॅपलिंगचा पहिला टप्पा पूर्ण करून त्यांच्या ग्रुपचे गिर्यारोहक खाली आले तेव्हा तेदेखील रॅपलिंगद्वारे कोकणकड्यावरून खाली येत होते; मात्र अचानकपणे त्यांचा ग्रुपशी संपर्क तुटला आणि ते संध्याकाळी बेपत्ता झाले. कोकणकड्याची सुमारे दोन हजार फूट उंची आहे. कोकणकड्यापासून जिथून सावंत यांचा संपर्क तुटला ती उंची एक हजार फुटांची आहे.रॅपलिंग करून खाली आलेल्या त्यांच्या ग्रुपच्या सदस्यांना ‘ट्रेकसोल’च्या नाशिक येथील गिर्यारोहक जे कॅम्पेनिंगकरिता थांबलेले होते. त्यांनी सकाळी रोहिदास गडावर ट्रेकिंगचा बेत रद्द करत सावंत ग्रुपचे गिर्यारोहक रॅपलिंगद्वारे खाली गेलेले आहे, त्यांना ‘रेस्क्यू’ करत वरच्या बाजूने सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘टास्क’ हाती घेतला.सर्व अत्यावश्यक साधने असल्यामुळे डॉ. अजय धोंडगे, डॉ. अजय जाधव, डॉ. हेमंत बोरसे, प्रसाद कुलकर्णी यांनी रविवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत त्या ग्रुपच्या एकूण ११ सदस्यांना सुखरूप ठाणे जिल्ह्णातील खिरेश्वर गावात आणले. हे सर्व ट्रेकर्स रात्री मुक्कामी गडावर थांबलेले होते.रविवारी त्यांचा रोहिदास गड चढण्याचा बेत होता; मात्र सावंत यांची दुर्दैवी घटना घडल्याने त्यांनी तो रद्द केला. हे नाशिककर गिर्यारोहक मूळ वैनतेय गिरीभ्रमण संस्थेशी जोडलेले आहे. डोंगरांवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये हौशी पर्यटकांचा अधिक समावेश आहे. गिर्यारोहकांचा अपवादानेच अपघाती मृत्यू घडले आहेत, मात्र त्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचे वैनतेय संस्थेचे प्रशांत परदेशी यांनी सांगितले. सावंत हे मुरब्बी गिर्यारोहकांपैकी एक होते. त्यांचा अपघाती मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे परेदशी म्हणाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू