शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: अवकाळी पावसामुळे सराड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:23 IST

सुरगाणा तालुक्यातील सराड येथे  सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

श्याम खैरनारसुरगाणा (जि. नाशिक) : सुरगाणा तालुक्यातील सराड येथे  सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडून सावळीराम निंबा भोये (७०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सावळीराम भोये हे आपल्या शेतात घरातील कोणालाही न सांगताच सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. याच सुमारास अंगावर वीज पडल्याने गोये यांचा जागीच मृत्यू झाला.

सायंकाळी घरच्यांनी शेतात व परिसरात शोधाशोध केली असता ते सापडले नाही. ते नेहमी भजनाला जात असल्याने ते भजनाला गेले असावेत सकाळी घरी परत येतील, असा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला होता. मात्र  शेतात शोध घेतला असता शेतातीलच आंब्याच्या झाडाजवळील खोल खड्यात गवत झुडपात त्यांचा मृतदेह दिसला. त्यांच्या डोक्याला व अंगावर वीज पडून भाजल्याचे आढळून आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन भोये यांचे ते वडील होते. या दूर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूNashikनाशिक