विनाकारण फिरणाऱ्यांना तृतीयपंथीयांकडून समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:12 IST2021-04-26T04:12:46+5:302021-04-26T04:12:46+5:30

बिटको चौकात नाकाबंदीच्या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तृतीयपंथी नाकाबंदीच्या कामात पोलिसांना सकाळी नऊ वाजेपासून दुपारी ...

Understanding from third parties to wanderers for no reason | विनाकारण फिरणाऱ्यांना तृतीयपंथीयांकडून समज

विनाकारण फिरणाऱ्यांना तृतीयपंथीयांकडून समज

बिटको चौकात नाकाबंदीच्या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तृतीयपंथी नाकाबंदीच्या कामात पोलिसांना सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत मदत करत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना अडविल्यानंतर तृतीयपंथी संबंधितांची कुठल्या कामाकरता बाहेर निघाले म्हणून विचारपूस करत आहे. शासन व पोलीस तुमच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी झटत असून, विनाकारण घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडला तर कोरोना तुम्ही घरी घेऊन जाल, अशी सूचना तृतीयपंथी वाहनधारकांना करत आहे. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगिरी, शीला पायल नंदगिरी, रुद्रमहा पायल नंदगिरी, दीपाली पायल नंदगिरी, निलम पायल नंदगिरी, राखी पायल नंदगिरी हे तृतीयपंथी स्वतः रस्त्यावर उतरून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पोलिसांच्या मदतीसाठी नाकाबंदीच्या कामात सहभागी झाले आहेत. गेल्यावर्षीसुद्धा या तृतीयपंथीयांनी नाकाबंदी व लॉकडाऊनमध्ये पोलिसांच्या कामात हिरिरीने सहभागी होऊन मदत केली होती.

(फोटो क्रमांक ७३)

Web Title: Understanding from third parties to wanderers for no reason