हमी योजनेंतर्गत जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने काम केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:07 IST2019-06-26T15:07:02+5:302019-06-26T15:07:33+5:30

नांदगाव: मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून ते, मजुरांच्या सहाय्याने न करता जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने करण्यात आले या भगवान मोरे यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथा उपजिल्हाधिकारी उमप नाशिक यांनी नांदगाव येथे भेट देऊन संबंधित व्यक्तींची चौकशी केली.

Under the warranty scheme C. B. Complaint of working with machine | हमी योजनेंतर्गत जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने काम केल्याची तक्रार

हमी योजनेंतर्गत जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने काम केल्याची तक्रार

ठळक मुद्देमोरे यांच्या तक्र ार्रीची येथील पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणून त्यांना नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागली. त्यावरून पुढील चक्र े फिरली.

नांदगाव:
मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून ते, मजुरांच्या सहाय्याने न करता जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने करण्यात आले या भगवान मोरे यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथा उपजिल्हाधिकारी उमप नाशिक यांनी नांदगाव येथे भेट देऊन संबंधित व्यक्तींची चौकशी केली.
दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी मजुरांना काम मिळावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जॉब कार्ड धारकांना दुरु स्ती व इतर हातांनी करावयाच्या कामाची कल्पना देऊन काम द्यावयाचे असा उद्देश आहे. मात्र प्रस्तुत प्रकरणात गरजूंच्या हातांना मिळणारे काम हिसकावून घेऊन यंत्राच्या सहाय्याने करण्यात आल्याच्या तक्र ारीला गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाने टोपली दाखवल्याने वरिष्ठांना साकडे घालण्याची वेळ मोरे व इतरांवर आली.

दि. २फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु करण्यात आलेले अंदाजे २० लाखांचे काम अद्याप हि अपूर्ण आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील लोकप्रतिनिधी व अधिकारी असे काही झालेच नाही. चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असा दावा करत आहेत. तक्र ारदार मोरे यांच्या म्हणण्यानुसार जे. सी. बी. ने काम करून घेण हि शासनाची फसवणूक आहे. तर मजुरांच्या तोंडचा घास काढून घेउन आपले खिसे भरण्याचा प्रकार आहे. चौकशीसाठी गेलेल्या अधिकाº्यांना मजुरांचे फावडे, घमेले असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. आता खोटे पुरावे सादर करण्याच्या प्रयत्नात लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकारी एकवटले आहेत. त्यांच्या या मिलीभगत विरु ध्द मजुरांना न्याय मिळावा अशी मोरे यांची मागणी आहे.
-त्यांची आपपसातली भानगड आहे. तालुक्यात कुठे हि जे. सी. बी. ने काम झालेल नाही.-गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी

 

 

 

Web Title: Under the warranty scheme C. B. Complaint of working with machine