अवनखेड ग्रामपंचायतीचीची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:13 IST2020-03-19T21:47:41+5:302020-03-20T00:13:40+5:30

अवनखेड ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Undefeated Gram Panchayat Election Unopposed | अवनखेड ग्रामपंचायतीचीची निवडणूक बिनविरोध

अवनखेड ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडीप्रसंगी नरेंद्र जाधव. समवेत कचरू पाटील, गुलाबराव पिंगळ पोलीसपाटील सतीश निकम, बाजीराव पिंगळ, विष्णू वसाळ, आनंदा पवार, कोंडाजी जाधव, त्र्यंबकराव पिंगळ आदी.

दिंडोरी : अवनखेड ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून सर्वसाधारण महिला अर्चना संदीप पिंगळे, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला भारती किरण पवार, अनुसूचित जाती विनायक काशीनाथ निकम, प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जमाती रघुनाथ रुंजा गांगोडे, अनुसूचित जमाती महिला मंदाबाई काळू लांडे, अनुसूचित जमाती महिला अलका साहेबराव बोरस्ते, प्रभाग क्र. ३ सर्वसाधारण मंगेश विष्णू जाधव, सर्वसाधारण महिला कल्पना रमेश वसाळ, नागरिकांचा मागास प्रवर्ग नरेंद्र कोंडाजी जाधव आदींची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच नरेंद्र जाधव, कचरू पाटील, गुलाबराव पिंगळ पोलीसपाटील सतीश निकम, बाजीराव पिंगळ, विष्णू वसाळ, आनंदा पवार, कोंडाजी जाधव, त्र्यबंकराव पिंगळ, सुदाम वसाळ, साहेबराव बोरस्ते, प्रमोद निकम, दत्तात्रय पिंगळ, पप्पू निकम आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Undefeated Gram Panchayat Election Unopposed