नांदगावकरांना अशुद्ध पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:34 IST2021-02-08T21:03:05+5:302021-02-09T00:34:23+5:30
नांदगाव : दहेगाव व माणिकपुंज धरणातून येणारे पाणी शुद्धीकरण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया राबवली जात नसल्याने नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार युवा फाउंडेशनने केली आहे.

नांदगावकरांना अशुद्ध पाणीपुरवठा
नांदगाव : दहेगाव व माणिकपुंज धरणातून येणारे पाणी शुद्धीकरण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया राबवली जात नसल्याने नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार युवा फाउंडेशनने केली आहे.
गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून शहराला होणारा पाणीपुरवठा थकबाकीच्या कारणावरून अनियमित झाल्याने अनेकदा दहेगाव किंवा माणिकपुंज धरणाचे पाणी नळाद्वारे येते. इतर योजनांचे काहीसे अशुध्द पाणी पिण्यात आल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडले असून नगरपरिषद व जिल्हा परिषदेने थकबाकीच्या मुद्यावर योग्य मार्ग काढून गिरणा धरणाचे पाणी नियमित उपलब्ध करून द्यावे. नागरिकांच्या आरोग्याविषयी खेळ खेळू नये, असे आवाहन फाउंडेशनचे सुमित सोनवणे यांनी केले आहे.