शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साधुग्रामच्या जागेवरील अनधिकृत झोपड्या हटविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:45 IST

नाशिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविले.

पंचवटी : नाशिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविले.  अतिक्रमण हटविताना महापालिकेने झोपडपट्टीधारकांच्या वस्तू जप्त करण्याची कारवाई केली आहे. महापालिकेने शुक्रवारी जवळपास ३५ अनधिकृत झोपड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. गेल्याच आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात साधुग्रामच्या जागेवरील असलेल्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई केली होती. जवळपास १०० हून अधिक झोपड्या हटविण्यात आल्यानंतर शेवटच्या टप्प्यातील झोपड्यांचे अतिक्रमण असताना झोपडपट्टीतील काही महिलांनी महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर महापालिकेच्या अधिकाºयांनी आडगाव पोलिसांना माहिती करून जादा पोलीस कुमक मागवून पोलीस बंदोबस्तात राहिलेल्या झोपड्या हटविण्याचे काम केले होते. या प्रकारानंतर झोपडपट्टीतील त्या महिलांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून मनपाच्या अधिकाºयांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यासाठी धाव घेतली खरी; मात्र कोणतीही तक्र ार दाखल न करताच तसेच माघारी फिरले होते. साधुग्रामच्या आरक्षित जागेवरील झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडाभराचा कालावधी लोटत नाही तोच त्या जागेवर पुन्हा अनधिकृतपणे झोपड्या तसेच पाल उभारून अतिक्रमण करून महापालिका प्रशासनासमोर आव्हान ठाकले होते. महापालिकेने अखेर शुक्रवारी तपोवनातील साधुग्रामच्या आरक्षित जागेवर थाटलेल्या अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण हटवून झोपडपट्टीधारकांचे साहित्यही जप्त करण्याची कारवाई केली आहे. संरक्षक भिंतीचा प्रस्ताव प्रलंबितमहापालिकेच्या ज्या जागेवर सातत्याने अतिक्रमण होते ती प्रशासनाच्या ताब्यात आहे. मात्र त्याठिकाणी कुंपण केलेले नाही अथवा संरक्षक भिंतदेखील बांधलेली नाही. त्यामुळे या जागेवर झोपडपट्ट्या होत असतात. याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी अतिक्रमण विभागाने बांधकाम आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याने मनपाला वारंवार अतिक्रमणे हटवण्यासाठी जाऊन संघर्ष करावे लागत आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका