पिवळ्या शिधापत्रिकांचे अनधिकृत वाटप

By Admin | Updated: May 23, 2014 01:08 IST2014-05-23T00:27:30+5:302014-05-23T01:08:31+5:30

नाशिक : तत्कालीन शहर धान्य वितरण अधिकार्‍यांनी कोणत्याही कागदपत्रांची खातरजमा न करता मोठ्या प्रमाणात वाटप केलेल्या पिवळ्या शिधापत्रिकांची चौकशी करून अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड या संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Unauthorized allotment of yellow ration cards | पिवळ्या शिधापत्रिकांचे अनधिकृत वाटप

पिवळ्या शिधापत्रिकांचे अनधिकृत वाटप

नाशिक : तत्कालीन शहर धान्य वितरण अधिकार्‍यांनी कोणत्याही कागदपत्रांची खातरजमा न करता मोठ्या प्रमाणात वाटप केलेल्या पिवळ्या शिधापत्रिकांची चौकशी करून अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड या संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
धान्य वितरण अधिकार्‍यांनी उत्पन्नाचे दाखले, रहिवास पुरावा व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यादीतील नावांची पडताळणी न करता जवळपास १११ शिधापत्रिका तयार करून त्याचे वाटप चालविल्याची बाब फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आली होती. त्यात छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड या संघटनेने पुराव्यादाखल काही शिधापत्रिकाही तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना सादर केल्या होत्या व घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात याबाबत काहीच हालचाल झाली नसल्याने गुरुवारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍याची भेट घेऊन संबंधित अधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी केली. यावेळी अजिज पठाण, शेख मुस्ताक करीम, श्याम गायकवाड, शेख अझहर, शफिक शेख, इम्तियाज खान आदि उपस्थित होते.

Web Title: Unauthorized allotment of yellow ration cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.