उमराणेचा आठवडा बाजार बंद; प्रशासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:37 IST2021-03-05T20:49:54+5:302021-03-06T00:37:04+5:30
उमराणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उमराणेत दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत आठवडे बाजार बंदच राहील अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासक एस.एस.पवार यांनी दिली आहे.

उमराणेचा आठवडा बाजार बंद; प्रशासनाचा निर्णय
परिसरातील बहुतांश गावांचे केंद्रबिंदू असलेल्या उमराणे येथे दर शनिवारी मोठा आठवडे बाजार भरतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची विशेषत: महिलांची गर्दी होत असते. होत असलेली गर्दी बघता कोरोना टाळण्यासाठी मास्क, दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर, सॅनेटायझर आदी बाबींचा वापर होत नसल्याचे चित्र असून गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात दररोज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होत असलेली वाढ बघता खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला असल्याचे जाहीर केले. दरम्यान १२ मार्च रोजी उमराणे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुूक होत असल्याने प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत प्रत्येक मतदारांकडे मत मागताना बहुतांश उमेदवांंकडृन मतदारांची गळाभेट, हस्तांदोलन, पाया पडणे आदी बाबी होत असल्याचे चित्र आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली असून कोरोना प्रादुर्भाव टाळण्याबाबत आरोग्य विभागाकडे माहिती विचारली असता नागरिकांसह उमेदवारांनी मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच वारंवार सॅनेटायझरचा उपयोग करण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. दीपक पवार यांनी दिला आहे.