उमरझरी मध्यम प्रकल्पातूनही सिंचनाची समस्या कायम
By Admin | Updated: May 3, 2017 01:08 IST2017-05-03T00:57:20+5:302017-05-03T01:08:43+5:30
तालुक्यातील सर्वात मोठे मध्यम प्रकल्प म्हणून उमरझरी मध्यम प्रकल्पाची ओळख आहे.

उमरझरी मध्यम प्रकल्पातूनही सिंचनाची समस्या कायम
नाशिक : रविवारी जिल्ह्यातील बहुतांशी भागाला वादळीवारा व गारपिटीने झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने सुमारे पाचशेहून अधिक हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल खात्याने व्यक्त केला असून, गेल्या दोन दिवसांपासून तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून शेतपिकांचे पंचनामे सुरूच असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. निफाड व इगतपुरी या दोन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हवामानातील बदल व गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे रविवारी अचानक अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.
वादळी वारा, विजेचा कडकडाट करीत गारांसह कोसळलेल्या या पावसामुळे थेट जीवित हानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील उभे पीक व खळ्यात साठवून ठेवलेला माल या पावसात पूर्णपणे नष्ट झाला आहे. वाऱ्यांमुळे द्राक्षबागा कोसळल्या तर काढणीवर आलेले द्राक्षे जमिनीवर गळून पडले. कांदा, डाळींब, टोमॅटो, मिरची या नगदी पिकांनाही जोरदार फटका बसला आहे.
या नुकसानीची दखल घेत सोमवारी महसूल खात्याने पीक पंचनाम्याचे आदेश तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहायकांना दिले असता प्रथमदर्शनी सुमारे पाचशे हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज आहे. या पावसामुळे निफाड व इगतपुरी तालुक्यातील प्रत्येकी सुमारे ३३ टक्के पिके उद्ध्वस्त झाली आहेत. निफाड तालुक्यात ६९ हेक्टरवरील द्राक्ष, ७८ हेक्टरवरील कांदा व ९० हेक्टरवरील भाजीपाला असे सुमारे २३७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला तर इगतपुरी तालुक्यात २० हेक्टरवरील भाजीपाला, १० हेक्टर मका व ३० हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. कळवण तालुक्यात ५१ हेक्टर कांदा, ३५ हेक्टर मिरची, ६७ हेक्टर टोमॅटो असे एकूण १७७ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.
भिंत कोसळली; जनावरे दगावलीविजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील मौजे झिरे पिंपरे येथील एकनाथ यशवंत शिरसाठ हे जखमी झाले, तर यशवंत रामा सोनवणे यांच्या चार शेळ्या दगावल्या आहेत. झिरे पिंपळ येथे पावसामुळे भिंत कोसळून प्रमिला अहेर, कुणाल अहेर, कल्याणी अहेर, माऊ अहेर हे चौघे जण जखमी झाले तर असाच प्रकार देवळा शिवारात घडून माधुरी पवार, सीमा सचिन जाधव या दोन महिला जखमी झाल्या आहेत.