शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

अल्टिमेटम ! तर खासगी डॉक्टर जाणार संपावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 1:25 AM

कोरोना संक्र मणाच्या काळात दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या खासगी डॉक्टरांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक सरकारकडून दिली जात आहे. सातत्याने विविध नियम व कायद्याच्या परिपत्रकांचे कागदी घोडे नाचवून सरकार डॉक्टरांना या संकटकाळात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देसरकारी धोरणांविरोधात संतापाची लाट डॉक्टरांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळत असल्याची भावना

नाशिक : कोरोना संक्र मणाच्या काळात दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या खासगी डॉक्टरांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक सरकारकडून दिली जात आहे. सातत्याने विविध नियम व कायद्याच्या परिपत्रकांचे कागदी घोडे नाचवून सरकारडॉक्टरांना या संकटकाळात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.संघटनेची राज्यस्तरीय भूमिका स्पष्ट करताना मंगळवारी (दि.१५) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, या आठवडाभरात सरकारने सामंजस्याने तोडगा न काढल्यास संपूर्ण राज्यात आयएमए द्वारे काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.सरकारकडून कोविड व नॉनकोविड रु ग्णालयांवर सरसकट आणण्यात आलेले विविध निर्बंध आणि त्यांची वाढविली जाणारी मुदत, जैविक कचºयाचे प्रति किलोनुसार आकारले जाणारे दर, आॅक्सिजन व अन्य औषधांच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या किमती आणि राज्य सरकारने ठरवून दिलेले दरपत्रकाची नियमावलीचे हे गणित कुठेही न जुळणारे असून, खासगी रु ग्णालयांवर सरकारी दरपत्रकांची अंमलबजावणी सरकार बंधनकारक कसे करू शकते? असा सवाल चंद्रात्रे यांनी यावेळी केला.सरकारने कोरोना संक्रमण काळात आॅक्सिजन व अन्य औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणणे गरजेचे असताना सरकार खासगी डॉक्टरांवर अंकुश लावून त्यांच्यारु ग्णालयांवर निर्बंध आणण्याचे काम करत असल्याने संपूर्ण राज्यात खासगी डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झालेली आहे, त्यामुळेच राज्यस्तरावर येत्या आठवडाभरात जर सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसण्याशिवाय पर्याय या संकट काळात आता शिल्लक राहिलेला नाही, असेही चंद्रात्रे म्हणाले.दुष्काळात सरकार पाणी महाग करेल का...?दुर्दैवाने राज्यात एखाद्या भागात जर दुष्काळाची स्थिती ओढवली तर त्या भागात सरकार बाटलीबंद पाणी महाग करेल का आता प्रश्न उपस्थित करत या कोरोनाच्या संकटात आॅक्सिजनच्या किमती राज्यभरात भरमसाठ का वाढत आहे यावर सरकारचे अंकुश का नाही प्रतिप्रश्न आयएमएचे डॉक्टर समीर चंद्रात्रे यांनी उपस्थित केला. औद्योगिक क्षेत्राला होणारा आॅक्सिजनचा पुरवठा तत्काळ बंद केला जावा. सरकारने कोरोनाच्या काळात अत्यावश्यक औषधे, पीपीई सूट, मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझरच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.‘मास्क मस्ट’ अभियानआयएमएकडून याअगोदरच षटसूत्री जाहीर करण्यात आली होती. यातील सूचनांचे काटेकोर पालन झाले असले तर कोरोनाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर फैलाव शहरात आज नसता झाला.महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना पत्र देत प्रत्येकाला मास्कचा सक्तीने वापर करण्यासंदर्भात विनंती केली जाणार आहे. तसेच मास्क न वापरणाºया विरु द्ध कठोरपणे कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.घंटागाडी, सफाई कर्मचारी, सिग्नलवरील पोलीस अशा सर्वच घटकांद्वारे मास्क अनिवार्य आहे याबाबत जनजागृती करणे आता गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेरसुद्धा जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.लॉकडाऊनमध्ये शासनानेकाय साध्य केले?लॉकडाऊन काळात कुठल्या पर्यायी व्यवस्था उभी करण्यावर निर्णय घेतला गेला? लॉकडाऊन उठविण्यापूर्वी कोणती सुसूत्रता व कोरोना संक्र मण रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या गेल्या? असे प्रश्न उपस्थित करत या संक्र मण काळात कोरोनाशी झुंज देणाºया डॉक्टरांशी मात्र सरकार दुजाभाव करत आहे, हे दुर्दैवी असल्याचे चंद्रात्रे म्हणाले....तर शहराची परिस्थिती अधिक बिकट होईलमुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या चार शहरांची अवस्था सध्या बिकट झाली असून, येथे कोरोनाचे संक्र मण तेजीने होताना दिसत आहे, दर दिवशी एक दीड हजार पूर्ण रु ग्ण वाढू लागल्याने शहराची आरोग्यव्यवस्था अत्यंत तणावाखाली आली आहे. अशा स्थितीमध्ये खासगी डॉक्टरांना सरकारने जर काम बंद आंदोलन करण्यास भाग पाडले तर परिस्थिती अधिक भयावह होईल याचा विचार राज्य सरकारने करणे गरजेचे असल्याचे मत चंद्रात्रे यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टरGovernmentसरकार