शहरात वाढला उकाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:04+5:302021-05-30T04:13:04+5:30
तौक्ते वादळानंतर शहराच्या कमाल-किमान तापमानात घट झाली होती. यामुळे नाशिककरांना उकाड्यापासून मोठा दिलासाही मिळाला होता. वादळानंतर शहराचे वातावरण पुन्हा ...

शहरात वाढला उकाडा
तौक्ते वादळानंतर शहराच्या कमाल-किमान तापमानात घट झाली होती. यामुळे नाशिककरांना उकाड्यापासून मोठा दिलासाही मिळाला होता. वादळानंतर शहराचे वातावरण पुन्हा ‘हॉट’ होण्यास सुरुवात झाली. तरीदेखील दोन दिवसांपर्यंत वारे वेगाने वाहत असल्याने वातावरणात फारसा उष्मा जाणवत नव्हता; मात्र, शनिवारी सकाळपासून दिवसभर वाऱ्याचा वेग हा शहरात मंदावलेला राहिला. तसेच ढगही दाटून आल्याने नाशिककरांना दमट वातावरणासह उकाड्याचा सामना करावा लागला. यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. संध्याकाळपर्यंत शहरात माॅन्सूनपूर्व सरी जोरदार हजेरी लावतील, अशी शक्यता वाटत होती. मात्र, सायंकाळपर्यंत कोठेही पावसाचा शिडकावा झालेला नव्हता. ढगाळ हवामान मात्र कायम होते. आठवडाभरापासून किमान तापमानातसुद्धा वाढ होत आहे. शनिवारी किमान तापमानाचा पारा २३.८ अंशापर्यंत पोहचल्याचे रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.