शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:07 IST

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक मध्ये मोठे राजकीय घमासान सुरू झाले असून उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक मध्ये मोठे राजकीय घमासान सुरू झाले असून उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत, जो महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, विनायक पांडे आणि यतीन वाघ हे भाजपच्या वाटेवर असल्याची कुणकुण लागताच त्यांची उद्धवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांच्या हकालपट्टीची माहिती दिली.

"पक्षविरोधी कारवायांबद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र!", अशी संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

शिवसेनेसह काँग्रेसलाही गळती

आज होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे भाजपने एकाच वेळी शिवसेना उबाठा आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विनायक पांडे हे उद्धव सेनेचा आक्रमक चेहरा आणि माजी महापौर होते. तर, यतीन वाघ यांची उद्धव सेनेतील प्रभावी नेते म्हणून ओळख होती. केवळ उद्धवसेनेलाच नाही, तर काँग्रेससाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. अनेक दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या खैरे घराण्यातील शाहू खैरे यांनी भाजपची वाट धरल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

नाशकात भाजपची ताकद वाढणार

नाशिक महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पांडे, वाघ आणि खैरे यांच्याकडे दांडगा जनसंपर्क आणि स्वतःचे हक्काचे वॉर्ड आहेत. या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भाजपची ताकद कित्येक पटीने वाढणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray expels Pandey, Wagh; Raut announces after BJP move.

Web Summary : Uddhav Thackeray expelled Vinayak Pandey and Yatin Wagh from Shiv Sena as they joined BJP before Nashik elections. This move, announced by Sanjay Raut, impacts Shiv Sena (UBT) and Congress, strengthening BJP in Nashik.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना