उद्धव ठाकरे यांची आज मालेगावी सभा

By Suyog.joshi | Updated: March 26, 2023 12:14 IST2023-03-26T12:13:31+5:302023-03-26T12:14:15+5:30

या सभेत उद्धव ठाकरे कुणा-कुणावर निशाणा साधतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

uddhav thackeray meeting in malegaon today | उद्धव ठाकरे यांची आज मालेगावी सभा

उद्धव ठाकरे यांची आज मालेगावी सभा

मालेगाव (जि. नाशिक) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील सभेनंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज रविवारी (दि. २६) मालेगावी सायंकाळी ५ वाजता पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे कुणा-कुणावर निशाणा साधतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मालेगावी अतिरिक्त कुमक मागवत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे हे दुपारी ३:३०च्या सुमारास मुंबईहून विमानाने ओझर विमानतळावर येणार असून, तेथून कारने ते मालेगाव येथे रवाना होणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री सुभाष देसाई, सुषमा अंधारे, विजय घोसाळकर आदी नेते उपस्थित राहणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी या सभेचे आयोजन केले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या होम ग्राऊंडवर होणाऱ्या या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: uddhav thackeray meeting in malegaon today