उद्धव ठाकरे नाशकात पदाधिकारी शिंदे गटात; माजी सभापती माजी नगरसेविकासह अनेकांचा प्रवेश

By संजय पाठक | Updated: March 26, 2023 09:46 IST2023-03-26T09:44:42+5:302023-03-26T09:46:08+5:30

ठाण्यात प्रवेश सोहळा

uddhav thackeray in nashik and office bearers join shinde group and entry of many including ex chairman | उद्धव ठाकरे नाशकात पदाधिकारी शिंदे गटात; माजी सभापती माजी नगरसेविकासह अनेकांचा प्रवेश

उद्धव ठाकरे नाशकात पदाधिकारी शिंदे गटात; माजी सभापती माजी नगरसेविकासह अनेकांचा प्रवेश

संजय पाठक, नाशिक-उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव मध्ये सभा असून त्यासाठी ते नाशिकमध्ये दाखल होणार असताना दुसरीकडे याच पक्षाचे पदाधिकारी आणि काही माजी लोकप्रतिनिधी विशेषतः महिला आघाडी शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

आज सकाळी 11 वाजता ठाणे येथे हा प्रवेश होणार असून त्यासाठी संबंधित पदाधिकारी रवाना झाले आहेत. शिवसेनेचे  (शिंदे गटाचे) महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी माहिती दिली प्रवेश करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये नाशिक महापालिकेचया शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि ठाकरे गटाचे विद्यमान उपमहानगर प्रमुख शशिकांत कोठुळे माजी नगरसेविका ऍड शामला दीक्षित यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे शोभा गटकळ,मंगला भास्कर, शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील आणि निलेश भार्गवे यांचा प्रवेश सोहोळा होणाऱ्या आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: uddhav thackeray in nashik and office bearers join shinde group and entry of many including ex chairman