उदासिन नगरसेवक, बैठकीचा खोळंबा पूर्व प्रभाग: गणसंख्येअभावी ताटकळले अधिकारी

By Admin | Updated: May 30, 2014 01:06 IST2014-05-29T23:32:29+5:302014-05-30T01:06:42+5:30

इंदिरा नगर- नागरी कामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक नेहमीच करीत असतात. परंतु अनेक नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकींनाच उपस्थित राहात नसल्यामुळे सभा तहकुब करण्याची वेळ येते. पूर्व प्रभाग समिती आज अशीच वेळ आल्याने अन्य उपस्थित नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित नगरसेवक इतकेच उदासिन असतील तर प्रभाग समितीच्या सभाच बंद करण्याची मागणीही करण्यात आली.

Udasin Councilors, Determination of the meeting East division: Officers waiting for absence of Ganesha | उदासिन नगरसेवक, बैठकीचा खोळंबा पूर्व प्रभाग: गणसंख्येअभावी ताटकळले अधिकारी

उदासिन नगरसेवक, बैठकीचा खोळंबा पूर्व प्रभाग: गणसंख्येअभावी ताटकळले अधिकारी

इंदिरा नगर- नागरी कामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक नेहमीच करीत असतात. परंतु अनेक नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकींनाच उपस्थित राहात नसल्यामुळे सभा तहकुब करण्याची वेळ येते. पूर्व प्रभाग समिती आज अशीच वेळ आल्याने अन्य उपस्थित नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित नगरसेवक इतकेच उदासिन असतील तर प्रभाग समितीच्या सभाच बंद करण्याची मागणीही करण्यात आली.
पूर्व प्रभाग समितीची सभा गुरूवारी सभापती कुणाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा प्रकार घडला. सकाळी साडे अकरा वाजता सभा होणार असल्याने महापालिकेचे विविध खात्यांचे अधिकारी वेळेत हजर होते. परंतु सदस्य पुरेशा संख्येने हजर नव्हते. गणसंख्या पूर्ती अभावी सभापतींना सभाच सुरू करता येत नसल्याने बैठकच सुरू झाली नाही अखेरीस उपस्थित काही नगरसेवकांनी गुलजार कोकणी आणि रंजना पवार यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला आणि बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली. तब्बल एक तासाने गणसंख्या पूर्ण झाली आणि मग सभेचे कामकाज सुरू झाले. तो पर्यंत दिवगंतांना श्रध्दांजली अर्पण करून सभा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.
प्रत्येक प्रभाग समिती बैठकीच्या वेळी गणसंख्या पूर्ण करण्यासाठी अनुपस्थित नगरसेवकांना भ्रमणध्वनी करावा लागतो. त्यानंतर सदस्य अर्धा एक तासाने येतात, जर नगरसेवकांनाच आपल्या प्रभागातील कामांची आस्था नसेल तर प्रभाग सभाच बंद करा, अशी मागणी संजय साबळे यांनी केली.
दरम्यान, भद्रकालीसह विविध भागात एका खासगी कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेले खोदकाम त्यामुळे होणारे अपघात, झाकीर हुसेन रूग्णालयात रोगनिदान सामग्री नसल्याने होत असलेली गैरसोय याबाबत साबळे यांनी तक्रार केली. तर दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटी परीसरात लेखंडी जाहिरातीचे फलक वीज तारांवर पडले. दुर्घटना टळली असली तरी अशा प्रकारचे फलक हटविण्याची मागणी यशवंत निकुळे यांनी केली. तर पाण्याची गळती थांबविणार्‍या कनिष्ठ अभियंता पाटोळे यांचा सत्कार संदीप लेनकर यांनी केला. यावेळी रंजना पवार, रशिदा शेख, निलीमा आमले, अर्चना थोरात आदी उपस्थित होते.

Web Title: Udasin Councilors, Determination of the meeting East division: Officers waiting for absence of Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.