अनधिकृत झाडे तोडण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST2021-07-16T04:11:56+5:302021-07-16T04:11:56+5:30
जुन्या पाइपलाइनमुळे दूषित पाणीपुरवठा नााशिक : सिडको परिसरात जुन्या पाइपलाइनमुळे नळांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. येथील ...

अनधिकृत झाडे तोडण्याचे प्रकार
जुन्या पाइपलाइनमुळे दूषित पाणीपुरवठा
नााशिक : सिडको परिसरात जुन्या पाइपलाइनमुळे नळांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. येथील पाइपलाइन बदलण्याची मागणी नेहमीच केली जाते. परंतु यावर केवळ चर्चा होत असून, त्याबाबतचे नियोजन केले जात नसल्याने नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागत आहे.
लोकशाही दिनाच्या तक्रारी ऑनलाइन
नाशिक : काेरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीचा विचार करता यंदा जुलैमध्ये होणारा लोकशाही दिन होणार नसला तरी नागरिकांना आपल्या तक्रारी व्हॉट्सॲपवर दाखल करता येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रारकर्त्यांनी आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत. लोकशाही दिनासाठीचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.
कर्जवाटप कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती
नाशिक : सहकारी संस्थांमध्ये सध्या कर्जवाटप हंगाम सुरू असल्याने येथे काम करणारे सचिव तसेच कर्मचाऱ्यांचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाटत आहे. याबाबत अनेक कर्मचाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे, तर काही कर्मचाऱ्यांना लागणदेखील झाली असल्याने भीती अधिकच व्यक्त केली जात आहे.