दीक्षी येथील दोघा युवकांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 01:07 IST2019-07-19T01:01:12+5:302019-07-19T01:07:05+5:30
ओझर टाउनशिप : दीक्षी येथील विठ्ठल परशराम आंबेकर या अडतीस वर्षीय युवकाने बुधवारी (दि.१७) रात्री कसबे व मौजे सुकेणे शिवारातून जाणाऱ्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. तर दीक्षी येथीलच एका युवकाने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

विठ्ठल परशराम आंबेकर
ठळक मुद्देनायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.
ओझर टाउनशिप : दीक्षी येथील विठ्ठल परशराम आंबेकर या अडतीस वर्षीय युवकाने बुधवारी (दि.१७) रात्री कसबे व मौजे सुकेणे शिवारातून जाणाऱ्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. तर दीक्षी येथीलच एका युवकाने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान विठ्ठल आंबेकर याची ओळख पटल्यानंतर तो दीक्षी येथील असल्याचे निष्पन्न झाले. दुसºया घटनेत सुनील मोहन चौधरी (१७, रा. राजीव गांधीनगर, दीक्षी) याने राहत्या घराच्या छताला नायलॉन दोरी बांधून त्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.