दोन कामगारांची प्रकृती खालावली

By Admin | Updated: September 1, 2014 01:26 IST2014-09-01T00:35:40+5:302014-09-01T01:26:06+5:30

दोन कामगारांची प्रकृती खालावली

Two workers fell | दोन कामगारांची प्रकृती खालावली

दोन कामगारांची प्रकृती खालावली

नाशिक : घंटागाडी कामगारांना तीन टप्प्यांत कायम करण्याच्या कामगार उपआयुक्तांनी दिलेल्या आदेशाची महापालिकेने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या दोन कामगारांची प्रकृती खालावली असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, आंदोलनाची दखल न घेणाऱ्या महापालिकेच्या विरोधात सोमवारी दुपारी घंटागाडी कामगार तीव्र निदर्शने करणार आहेत़ कामगार उपआयुक्तांनी महापालिकेला दिलेल्या आदेशानुसार आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर साडेचारशे घंटागाडी कामगारांना तीन टप्प्यांत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी घंटागाडी कर्मचारी संघटनेतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे़ २८ आॅगस्टपासून सुरू झालेल्या आमरण उपोषण आंदोलनातील नऊ घंटागाडी कामगारांपैकी विलास रंगनाथ तुपे व विजय रामा मराठे या दोन कामगारांची प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ १९९६ पासून घंटागाडीवर सफाई कामगार सेवाज्येष्ठतेप्रमाणे शहर स्वच्छतेचे काम करीत आहेत़ आजमितीला सुमारे ४५० घंटागाडी कामगार शहर स्वच्छतेचे काम करीत आहेत़ त्यातच शहर स्वच्छता ही अत्यावश्यक सेवा असल्याने ठेकेदारी पद्धतीने देता येत नसूनही महापालिका ठेकेदारी पद्धतीने काम करून घेते आहे़

Web Title: Two workers fell