अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 15:51 IST2019-01-02T15:51:03+5:302019-01-02T15:51:12+5:30
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील गुरेवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील गुरेवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. प्रमोद श्यामराव गुरव (४५), रा. अमरावती, हल्ली रा. उद्योग भवन, सिन्नर असे मृताचे नाव आहे. गुरव हे गोंदे फाटा परिसरात पुरोहित हॉटेलमध्ये आचारी म्हणून कामाला होते. रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून ते दुचाकीवरून घराकडे परतत असताना गुरेवाडी शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकरणी सुनील प्रल्हाद चिकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.