वडाळारोडवर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:30 IST2018-03-27T00:30:39+5:302018-03-27T00:30:39+5:30
भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२४) सायंकाळच्या सुमारास वडाळागाव रोडवर घडली़ गोवर्धन कोंडू इंगळे (३१, रा. भवर टॉवर, शिवाजीनगर, सातपूर) असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़

वडाळारोडवर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
इंदिरानगर : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२४) सायंकाळच्या सुमारास वडाळागाव रोडवर घडली़ गोवर्धन कोंडू इंगळे (३१, रा. भवर टॉवर, शिवाजीनगर, सातपूर) असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़ सातपूरच्या शिवाजीनगरातील भवर टॉवरमधील गोवर्धन इंगळे हा शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यामाहा दुचाकीवरून (एमएच १५, एई ९८८४) वडाळागावाकडून कलानगरकडे जात होता़ त्यावेळी वडाळारोडवरील गणेश बिल्डिंगजवळ समोरून भरधाव आलेल्या महिंद्रा कंपनीच्या टेम्पोने (एमएच १५, ईजी २४०४) दुचाकीला जोरदार धडक दिली़ यामध्ये दुचाकीचालक गोवर्धन इंगळे याच्या डोके, कपाळ व पायास जबर मार लागल्याने त्यास नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी टेम्पोचालक अब्दुल अहमद शेख (रा. गुलशनगर, वडाळागाव) विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे़