मालेगावी दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:50 IST2021-01-01T00:49:52+5:302021-01-01T00:50:12+5:30

मालेगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सुमारे २० ते २५ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटना छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. 

Two-wheeler thieves in Malegaon | मालेगावी दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ 

मालेगावी दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ 

मालेगाव : शहरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सुमारे २० ते २५ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटना छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. 
या चोरीमुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी एकाच दिवशी शहरातील विविध भागांतून तीन दुचाकी लंपास केल्या आहेत.  शहरातील महेशनगर भागातून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएन ४९१३ ही चोरून नेली आहे. या प्रकरणी शेख रशीद शेख चाँद यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकर करीत आहेत.  मालेगाव छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपर सत्र न्यायालयाच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी  दुचाकी  चोरून नेली आहे. या प्रकरणी खलील अहमद अब्दुल अजीज (रा. आझादचौक) यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Web Title: Two-wheeler thieves in Malegaon