मालेगावमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:10 IST2021-01-01T04:10:00+5:302021-01-01T04:10:00+5:30
----- अमिनाबाद भागात एकावर कटरने वार मालेगाव : शहरातील अमिनाबाद भागात पैसे मागितल्याचा राग येऊन एकाने धारदार कटरने वार ...

मालेगावमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
-----
अमिनाबाद भागात एकावर कटरने वार
मालेगाव : शहरातील अमिनाबाद भागात पैसे मागितल्याचा राग येऊन एकाने धारदार कटरने वार करून गुलाम मुस्तफा मोहंमद यासीन यांना जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मो. यासीन यांनी रमजानपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घर बांधण्यासाठी वडील मोहंमद यासीन जमिल अहमद यांच्याकडे मुलगा गुलाम मुस्तफा मो. यासीन यांनी पैसे मागितले असता त्यांनी मारहाण करून कटरने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करीत आहेत.
----
आंबेडकरनगर भागात तरुणाची आत्महत्या
मालेगाव : शहरातील आंबेडकरनगर भागात गौतम राजू मगरे (३४) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती नितीन निंबा झाल्टे यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात दिली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार निकम करीत आहेत.