इंदिरानगर - आडगाव परिसरातून बुलेटसह दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 17:18 IST2017-11-06T16:47:44+5:302017-11-06T17:18:24+5:30

शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच

Two-wheeler theft with bullets from Indiranagar and Adgaon area | इंदिरानगर - आडगाव परिसरातून बुलेटसह दुचाकीची चोरी

इंदिरानगर - आडगाव परिसरातून बुलेटसह दुचाकीची चोरी


नाशिक : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, इंदिरानगर व आडगाव परिसरातून बुलेटसह अ‍ॅक्टिवा दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे़
इंदिरानगर परिसरातील जाखडीनगर येथील रहिवासी सुभेगसिंग वीरसासिंग सिद्धू (रा. शांतिकुंज सोसायटी) यांची ७० हजार रुपये किमतीची एनफिल्ड कंपनीची बुलेट दुचाकी (एमएच १५ एफके १९४५) चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरीची दुसरी घटना तपोवन परिसरात घडली़ डीजीपीनगर येथील रहिवासी संकेत हेमंत कोतवाल यांची २० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिवा (एमएच १५ डीडब्ल्यू ६११४)दुचाकी चोरट्यांनी तपोवनातील रामसृष्टी गार्डनसमोरून चोरून नेली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler theft with bullets from Indiranagar and Adgaon area