मालवाहतूक गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:44 IST2022-02-05T00:44:23+5:302022-02-05T00:44:45+5:30
येवला : तालुक्यातील ठाणगाव - पाटोदा रस्त्यावर मालवाहतूक गाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

मालवाहतूक गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
येवला : तालुक्यातील ठाणगाव - पाटोदा रस्त्यावर मालवाहतूक गाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
ठाणगाव - पाटोदा रस्त्यावर दुचाकीवरून (क्रमांक एमएच १५ एचएफ २३५९) संदीप भानुदास कदम (२२ रा. नांदूर ता. येवला) हा घराकडे चालला होता. यावेळी समोरून येणाऱ्या मालवाहतूक गाडीने (क्रमांक एमएच १५ जीव्ही ८८५९) दुचाकीला धडक दिली.
शुक्रवारी, (दि. ४) सकाळी ११.३० च्या सुमारास सदर घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार संदीप कदम यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळावरून मालवाहतूक चालक फरार झाला असून तालुका पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.