कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:11 IST2020-02-11T14:11:31+5:302020-02-11T14:11:58+5:30
सिन्नर : सिन्नर-संगमनेर रस्त्यावरील लिंगटांगवाडी शिवारात मारूती ओम्नी कारने समोरून येणाऱ्या दोन मोटार सायकलींना धडक दिल्याने एक मोटार सायकलस्वार ठार झाला तर दोघे जखमी झाले.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सिन्नर : सिन्नर-संगमनेर रस्त्यावरील लिंगटांगवाडी शिवारात मारूती ओम्नी कारने समोरून येणाऱ्या दोन मोटार सायकलींना धडक दिल्याने एक मोटार सायकलस्वार ठार झाला तर दोघे जखमी झाले. दि. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात झाला. ओम्नी क्रंमाक (जी. जे. ०५ पी. पी. २८३४) संगमनेर कडून सिन्नर कडे जात असताना समोरून येणाºया स्प्लेंडर क्र मांक (एम. एच. १५. बी. वाय. ३८६७) ला धडक दिली. त्यात स्पलेंडर चालक अशोक एकनाथ जायभावे (४२) रा. गोंदे गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. तर त्याच वेळी ओम्नीने समोरून येणाºया बजाज एम.एटीलाही धडक दिली. त्यात त्यावरील जमील अहमद सैय्यद (२७) व बबलू अबुल हुसेन सय्यद (३०) दोघेही रा. लिंगटांगवाडी यांना जखमी केले. सदर अपघातानंतर ओम्नी चालक माहितीन न देता पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी ओम्नीच्या चालकाच्या विरोधात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा व दोन्ही मोटार सायकलींच्या नुकसानीस जबाबदार धरत गुन्हा दाखल केला आहे.