कारवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 15:31 IST2018-12-02T15:31:03+5:302018-12-02T15:31:18+5:30
सिन्नर : तालुक्यातील कारवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. राजेंद्र सोपान जाधव असे जखमीचे नाव आहे.

कारवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी
सिन्नर : तालुक्यातील कारवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. राजेंद्र सोपान जाधव असे जखमीचे नाव आहे. कारवाडी येथील राजेंद्र सोपान जाधव व बालम रामदास जाधव हे दोघे दुचाकीवरून घरी परतत होते. रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या द्राक्षबागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झडप घातली. यावेळी पाठीमागे बसलेले राजेंद्र जाधव यांच्या डाव्या पायाच्या बोटाला बिबट्याच्या फटका बसला. प्रसंगावधान राखत बालम जाधव यांनी दुचाकीचा वेग वाढवत घर गाठले. राजेंद्र जाधव यांच्यावर दोडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. दिवसेंदिवस या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे.