बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 13:28 IST2019-01-01T13:28:32+5:302019-01-01T13:28:38+5:30
सिन्नर: तालुक्यातील पंचाळे येथील राजेंद्र कचरू जगताप हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी
सिन्नर: तालुक्यातील पंचाळे येथील राजेंद्र कचरू जगताप हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. राजेंद्र जगताप हे मुलगा अजय याच्याबरोबर मोटारसायकलने तामसवाडी येथील बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. सायंकाळी गावी घराकडे परतत असताना तामसवाडी ते ब्राम्हणवाडे जवळ रस्त्यालगत झाडाआड दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. यात राजेंद्र यांची पॅन्ट फाटून डाव्या पायाच्या पोटरीवर मोठी जखम झाली. बिबट्याच्या हल्ल्यात पायाला गंभीर जखम झाल्याने त्यांनी दोडी येथील दवाखान्यात उपचारसाठी दाखल केले आहे. त्यांना वनविभागाने आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावी अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.