दुचाकीस्वारास मारहाण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:42 IST2017-10-12T13:42:27+5:302017-10-12T13:42:51+5:30

दुचाकीस्वारास मारहाण !
शिरपूर जैन : रस्त्याच्या बाजूने चला, असे म्हटल्याने बेलगाव येथील दुचाकीस्वार गजानन नामदेव शेवाळे यांना मारहाण करणाºया तरोडी येथील तिघांविरूद्ध ११ आॅक्टोबरला रात्रीदरम्यान विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
बेलगाव येथील गजानन शेवाळे हे आपल्या गावाहून ११ आॅक्टोबरला सायंकाळच्या सुमारास केनवड येथे जात होते. यावेळी तरोडी येथील विष्णू कुंडलिक नवघरे, दत्ता नवघरे, दिनेश भोसले असे तीन जण दुचाकीसमोर आले. त्यामुळे शेवाळे यांनी या तिघांना रस्त्याच्या बाजूने चला,असे म्हटले. त्यावर आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करीत दातही पाडला, असे शेवाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी तिघांविरूद्ध भादंवी कलम ३२५, ३२३,५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास जमादार रतन बावस्कर करीत आहेत.