शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकावर दुचाकी  आदळून दोघा मित्रांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:06 IST

त्र्यंबकरोडवरील रस्ता दुभाजकावर भरधाव हार्ले डेव्हिडसन ही महागडी दुचाकी आदळून झालेल्या अपघातात शहरातील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रसाद भागवत शेरमाळे (२९, रा. डीजीपीनगर-१) व रोशन चंद्रकांत हिरे (२९, रा. तिडके कॉलनी, बाजीरावनगर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत़

नाशिक : त्र्यंबकरोडवरील रस्ता दुभाजकावर भरधाव हार्ले डेव्हिडसन ही महागडी दुचाकी आदळून झालेल्या अपघातात शहरातील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रसाद भागवत शेरमाळे (२९, रा. डीजीपीनगर-१) व रोशन चंद्रकांत हिरे (२९, रा. तिडके कॉलनी, बाजीरावनगर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत़ दरम्यान, या अपघाताची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास प्रसाद व रोशन हे दोघे हॉटेल ग्रीन व्ह्यूकडून  हार्ले डेव्हिडसन (एमएच १५, एफपी ००९८) या दुचाकीने जिल्हा रुग्णालयाकडे येत होते़ त्र्यंबकरोडने येत असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व ते रस्ता दुभाजकावर जाऊन आदळले़ हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोघांच्याही डोक्यास मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़मयत प्रसाद शेरमाळे याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले होते तसेच तो वडिलांसोबत बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता़ एकुलता एक असलेल्या प्रसादच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे़ तर रोशन हिरे या तरुणाचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेला होता़ चांगल्या स्वभावाने तो परिसरातील सर्वांच्या परिचयाचा होता़दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दोघांच्याही नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू