मॉडेल कॉलनी चौकात दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST2020-12-29T04:13:08+5:302020-12-29T04:13:08+5:30

------- बनावट दस्तऐवजप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा नाशिक : बनावट मुखत्यारपत्र तयार करून खोटे खरेदीखत व बनावट धनादेश देत फसवणूक ...

Two-wheeler beaten to death in Model Colony Chowk | मॉडेल कॉलनी चौकात दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

मॉडेल कॉलनी चौकात दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

-------

बनावट दस्तऐवजप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा

नाशिक : बनावट मुखत्यारपत्र तयार करून खोटे खरेदीखत व बनावट धनादेश देत फसवणूक केल्याप्रकरणी सात संशयित भामट्यांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाजी पुंजाजी आहिरे (रा. महालपाटरे, ता. देवळा, नाशिक) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित संगीता जिभाऊ गांगुर्डे, मयूर जिभाऊ गांगुर्डे, सुशांत जिभाऊ गांगुर्डे (सर्व रा. गंगापूर रोड, नाशिक), सतीश सखाराम चौधरी, (रा. रविवारपेठ), वसंत मानाजी तालखे (रा. दिंडारी रोड), त्र्यंबक छोटू पवार (रा. शरणपुररोड), प्रणाली रवींद्र सुर्वे (रा. नाशिक) व इतर त्यांचे अज्ञात साथीदारांचा समावेश आहे. सर्व संशयितांनी संगनमत करून फिर्यादी दादाजी आहिरे यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत, त्यांच्या मालकीचे म्हसरुळ शिवारातील सर्व्हे नं. १६३/३अ या जमिनीच्या क्षेत्राचे बनावट मुखत्यारपत्र तयार करून, बनावट ‘सातबारा उतारा’ लावून, खोटे खरेदीखत तयार करुन घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

------

घरातून दोन लाखांचे दागिने लंपास

नाशिक : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. पाइपलाइन रोडवरील एका बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करत, अज्ञात चोरट्याने २ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संकेत नंदन दाणी (रा. पाइपलाइन रोड) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवार (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दाणी यांच्या घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या व ४० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------

Web Title: Two-wheeler beaten to death in Model Colony Chowk