सायने फाट्यावर दुचाकी अपघात; एक जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 17:43 IST2020-07-15T17:42:55+5:302020-07-15T17:43:10+5:30
मालेगाव : तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावर सायने फाट्याकडे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ दुचाकीचा अपघात होवून एक जण गंभीर जखमी झाला.

सायने फाट्यावर दुचाकी अपघात; एक जण गंभीर
मालेगाव : तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावर सायने फाट्याकडे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ दुचाकीचा अपघात होवून एक जण गंभीर जखमी झाला. ८ जुलै रोजी ही घटना घडली. तालुका पोलिसात नंदू हिरामण गवळी रा. मातामठ तालीमजवळ यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अनिल हिरामण गवळी याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी व फिर्यादी दोघे भाऊ असून नवीन दुचाकीवर चिपदरा येथे भरधाव वेगात दर्शनासाठी जात असताना रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकी स्लिप होवून अपघात झाला. यात फिर्यादीच्या डोक्यावर, कपाळावर गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.