सटाण्यात टोळक्याच्या दगडफेकीत दोघे जखमी, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 15:18 IST2019-12-17T15:17:55+5:302019-12-17T15:18:42+5:30

सटाणा : सात ते आठ जणांच्या मद्यपी टोळक्याने हॉटेलवर तुफान दगडफेक करून दोन जण गंभीर जखमी झाले .

 Two were injured in gang-raid, one arrested | सटाण्यात टोळक्याच्या दगडफेकीत दोघे जखमी, एकास अटक

सटाण्यात टोळक्याच्या दगडफेकीत दोघे जखमी, एकास अटक

सटाणा : सात ते आठ जणांच्या मद्यपी टोळक्याने हॉटेलवर तुफान दगडफेक करून दोन जण गंभीर जखमी झाले . ही घटना सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील दोधेश्वर मंदिरा जवळ घडली .याप्रकरणी सटाणा पोलिसांनी कौतिकपाडे येथील एकास अटक केली असून त्याला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत . कौतिकपाडे येथील राहुल रघुनाथ जाधव ,बबलू जाधव ,सुरज जाधव यांच्यासह सात ते आठ जणांच्या मद्यपी टोळक्याने दोधेश्वर येथे धूम स्टाईल मोटरसायकल नेऊन मंदिराजवळील जितु पाटील यांच्या हॉटेलवर गोंधळ घातला .याला मज्जाव करण्यास गेलेल्या कैलास कोंडाजी पानसरे (राहणार कोळीपाडा ) , अमोल पाटील (राहणार भाक्षी ) यांना या टोळक्याने बेदम मारहाण केल्यानंतर पुन्हा हॉटेलवर आणि त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यास सुरवात केली. दगडांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनी बचावासाठी आरडाओरडा केल्याने टोळके पसार झाले .घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सापळा रचून राहुल जाधव याला कौतिकपाडे शिवारातून अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी एक मोटरसायकल जप्त केली आहे.याप्रकरणी सटाणा पोलिसांनी राहुल जाधव ,बबलू जाधव ,सुरज जाधव यांच्यासह सात ते आठ जणांविरु द्ध दंगल ,दहशत माजविणे ,मारहाण ,जीवे ठार मारण्याची धमकी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .पोलिसांनी राहुल जाधव याला सटाणा न्यायालयासमोर उभे केले असतांना त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

Web Title:  Two were injured in gang-raid, one arrested

टॅग्स :Nashikनाशिक