शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:59 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी शनिवारी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येऊन वॉर्ड क्रमांक तीन व सात हे दोन्ही वॉर्ड महिला राखीव झाल्याने या वॉर्डातून निवडणुकीची तयारी करणाऱ्यांना पर्यायी वॉर्डाची चाचपणी करावी लागणार आहे.

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी शनिवारी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येऊन वॉर्ड क्रमांक तीन व सात हे दोन्ही वॉर्ड महिला राखीव झाल्याने या वॉर्डातून निवडणुकीची तयारी करणाऱ्यांना पर्यायी वॉर्डाची चाचपणी करावी लागणार आहे.सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या प्रांगणात आरक्षण सोडतीचा ड्रॉ काढण्यात आला. आरक्षण सोडतीकरिता २,३,६,७ या वॉर्डाच्या नंबरच्या चिठ्ठी आरक्षण सोडत पात्रात टाकण्यात आल्या. महिला आरक्षण सोडतीकरिता इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित नागरिकांच्या समोर ब्रिगेडियर धनंजयन यांनी चार कागदांपैकी पहिल्यांदा काढलेला चिठ्ठीवर सात व नंतर तीन नंबर निघाल्याने हे दोन्ही वॉर्ड महिला राखीव झाल्याची घोषणा करण्यात आली. ब्रिगेडियर अरविंद धनंजयन यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर, सायमंड भंडारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महिला आरक्षण सोडतीकरिता रतन चावला, सचिन ठाकरे, बाबूराव मोजाड, भगवान कटारिया, दिनकर पाळदे, दीपक बलकवडे, गुंडाप्पा देवकर, तानाजी करंजकर, तानाजी भोर, कावेरी कासार, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, चंद्रकांत कासार, सुरेश कदम, विलास पवार, संजय गोडसे, संतोष कटारे, नितीन गायकवाड, सुशील चव्हाण, प्रवीण पाळदे आदी उपस्थित होते.वॉर्ड क्रमांक सातमध्ये नगरसेवक बाबूराव मोजाड हे राष्ट्रवादी भाजप असा प्रवास करत सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत तीस वर्षे या वॉर्डाचे प्रतिनिधित्व करत होते, पण महिला आरक्षण सोडतीमुळे त्या वॉर्र्डातून यंदा त्यांच्या घरातून महिला उमेदवारी करू शकतात. यासह सीमा मोजाड, राधिका पाळदे, सरिता देवकर, नयना देवकर, रत्ना चौधरी, अर्पिता डांगे आदी इच्छुक आहेत, तर बाबूराव मोजाड हे वॉर्ड क्रमांक सहा किंवा चारमध्ये उमेदवारी करू शकतात.पूजा विधीचा फायदा कोणाला?मागील पंचवार्षिक निवडणूक पूर्व आरक्षण सोडतीच्या वेळेस काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्याची चर्चा होत होती. शनिवारीदेखील आरक्षण सोडत ज्या जागेवर होणार होती त्या जागेवर दोन इच्छुकांनी वेगवेगळ्या वेळेत पूजा केली, तर साफसफाई करणाºया कर्मचाऱ्यांना लिंबू व अंडे सापडल्याचीच चर्चा आरक्षण सोडतीच्या वेळेस होत होती.राजकारणाला कलाटणीमागील पंचवार्षिक निवडणूक पहिल्यांदाच पक्षांच्या चिन्हावरच झाल्या होत्या यंदा मात्र पूर्वीप्रमाणे पक्षाऐवजी पुन्हा पॅनलची निर्मिती निवडणुकीत होऊ शकते. महाविकास आघाडी या निवडणुकीसाठी काय निर्णय घेतात याप्रमाणे पक्ष का पॅनल असा सोयीस्कर मार्ग अवलंबला जाण्याची शक्यता आहे.वॉर्ड क्रमांक तीनमध्ये विद्यमान नगरसेवक उपाध्यक्ष भगवान कटारिया हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदा उमेदवारी करत भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीत त्यांची पत्नी अंकिता कटारिया उभ्या राहू शकतात. माजी उपाध्यक्षा सुनंदा कदम, सिमरन चावला, सोनाली गायकवाड, यास्मीन नाथानी या उमेदवारी करू शकतात.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक