दोन जातींची तब्बल चाळीस गिधाडे!

By Admin | Updated: June 25, 2014 00:13 IST2014-06-25T00:06:25+5:302014-06-25T00:13:24+5:30

दोन जातींची तब्बल चाळीस गिधाडे!

Two Vultures of Forty Forty Vats! | दोन जातींची तब्बल चाळीस गिधाडे!

दोन जातींची तब्बल चाळीस गिधाडे!

 

आनंद बोरा

नाशिक
त्र्यंबक तालुक्यातील हरसूलजवळच्या ठाणापाडा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी भारतीय गिधाड व पांढऱ्या पाठीचे गिधाड या दोन जातींची तब्बल चाळीस गिधाडे एकाच वेळी आढळून आली. नेचर क्लबच्या वतीने गिधाडांच्या संवर्धनासाठी त्यांची जिल्ह्यातील संख्या, त्यांच्या वसाहती शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शोधमोहिमेत ठाणापाड्याजवळच्या खैराई किल्ल्याच्या समोर सदर गिधाडे दृष्टीस पडली. तेथील दोन मृत जनावरे खाण्यासाठी ती आली होती. एकाच जनावरावर तुटून पडलेली दोन जातींची गिधाडे दिसणे ही दुर्मीळ घटना आहे. जनावरे खाण्यासाठी या दोन जातींमध्ये संघर्षदेखील बघावयास मिळत होता. गिधाडांना आता खाद्यच उपलब्ध होत नाही. वन विभागाच्या गिधाडे संवर्धन योजनेचा मोठा गाजावाजा झाला. आणखी दोन ‘रेस्टॉरंट’ला परवानगीदेखील मिळाली; पण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होत नसल्याने ही योजना अपयशी होताना दिसत आहे. जिल्ह्यात गिधाडांची संख्या बऱ्यापैकी वाढत असून, त्यांच्या संवर्धनासाठी योग्य पावले उचलण्याची वेळ आली आहे. जंगलातला हा फुकटचा सफाई कामगार वाचला तर आपण वाचणार आहोत, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Two Vultures of Forty Forty Vats!