वणी-कळवण रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:37 IST2020-10-30T21:52:12+5:302020-10-31T00:37:23+5:30
वणी : वणी-कळवण रस्त्यावर पायरपाडा ते अहिवंतवाडीचदरम्यान दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर सात जण जखमी झाले आहे.

वणी-कळवण रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक
वणी : वणी-कळवण रस्त्यावर पायरपाडा ते अहिवंतवाडीचदरम्यान दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर सात जण जखमी झाले आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. कळवण-वणी मार्गावर टीयूवी कार (एमएच १५ जीएक्स ३८८३) व समोरून येणारी स्विफ्ट(एमएच ४२ जीएक्स ४०१७) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका वाहनाचा चालक जागीच ठार झाला, तर दोन्ही वाहनातील सात जण जखमी झाले. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. भरधाव वेगातील अनियंत्रित वेगामुळे झालेल्या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात स्विफ्टचालक योगेश शांताराम शेवाळे (४२, राहा. मोकभणगी, ता. कळवण) हे जागीच ठार झाले, तर उर्वरित सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची नावे- नचिकेत योगेश बुराडे (५), अथर्व मधुकर सहाणे (१४), योगेश रामनाथ बुराडे (३४), ओमकार रतन महाले (२५), सुप्रिया योगेश बुराडे (९), स्वानंदी योगेश बुराडे, सर्व राहणार नाशिक व विभाबाई शांताराम शेवाळे (६०) मोकभणगी जखमी झाले.