मालेगाव शहरातून दोन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:21+5:302021-07-22T04:10:21+5:30

-------------------- न्यायालय आवारात हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा मालेगाव:- न्यायालयात साक्ष द्यायला का आला अशी कुरापत काढून एका जणाला ...

Two two-wheeler lamps from Malegaon city | मालेगाव शहरातून दोन दुचाकी लंपास

मालेगाव शहरातून दोन दुचाकी लंपास

--------------------

न्यायालय आवारात हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव:- न्यायालयात साक्ष द्यायला का आला अशी कुरापत काढून एका जणाला मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इम्तियाज खान अमानुल्ला खान, रा. कमालपुरा याने फिर्याद दिली आहे. न्यायालयात साक्ष देण्यासाठी का आला अशी कुरापत काढून शेख गुड्डू शेख शेख इसाक, शेख इसाक, शेख साबीर, शेख जाकीर, शेख हमीद शेख रा. मोमिनपुरा यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार टिळेकर करीत आहेत.

--------------------

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

मालेगाव : कारखाना टाकण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सात जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नबिला परविन मर्द शोएब अहमद या महिलेने फिर्याद दिली आहे. शोएब अहमद, मुक्तार अहमद, स्वलियाबानो,आफसा सिद्धीकी, मर्द शोएब अहमद, तौसिफ अहमद, वाजदाबानो, नदीम आदींनी छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास आसिफ शेख करीत आहेत.

Web Title: Two two-wheeler lamps from Malegaon city