मध्यप्रदेशात अडकलेले दोन हजार मजूर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 15:48 IST2020-04-22T15:48:37+5:302020-04-22T15:48:46+5:30
नांदगाव : लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेशात अडकलेल्या सुमारे दोन हजार मजुरांना महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक तास अडकून पडल्यानंतर अखेर महाराष्ट्रात प्रवेश मिळाला.

मध्यप्रदेशात अडकलेले दोन हजार मजूर दाखल
नांदगाव : लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेशात अडकलेल्या सुमारे दोन हजार मजुरांना महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक तास अडकून पडल्यानंतर अखेर महाराष्ट्रात प्रवेश मिळाला. नाशिक, जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातले हे मजूर असून छिंदवाडा जिल्हाधिकारी यांचे परवाना पत्र असतांना ही महाराष्ट्राच्या सीमेवर उन्हातान्हात कित्येक तासांची तिष्ठंती करावी लागली. मध्य प्रदेशात साखर कारखाने व मजुरीच्या कामासाठी गेलेले शेकडो मजूर गेला महिनाभर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. आंतरराज्यीय दळणवळणाच्या निर्बंधांमुळे त्यांना महाराष्ट्रात स्वगृही परत येणे शक्य होत नव्हते. या काळात जवळचे रेशन संपल्याने खासदार भारती पवार यांनी तेथील खासदार यांचेशी संपर्क साधून जीवनावश्यक धान्य देण्याची व्यवस्था केली होती. मात्र २० एप्रिल रोजी केंद्र शासनाने शिथिल केलेल्या नियमांमुळे छिंदवाडा जिल्हाधिकारी डॉ. श्रीनिवास शर्मा यांनी सदर मजुरांना त्यांच्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात जाण्याची परवानगी दि. २१ एप्रिल रोजी दिली. पत्र हातात पडल्यावर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शंभरापेक्षा अधिक टॅÑक्टरवर आपली बिर्हाडे लादून प्रवास सुरु केला.