जायखेड्यात दुचाकी चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:36 IST2020-01-20T16:36:18+5:302020-01-20T16:36:42+5:30
जायखेडा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात विक्र ी करणाऱ्या दोन दुचाकी चोरांना जायखेडा पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली.

जायखेड्यात दुचाकी चोरट्यांना अटक
जायखेडा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात विक्र ी करणाऱ्या दोन दुचाकी चोरांना जायखेडा पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दुचाकी चोर गजानन रमेश वाघ (उर्फ दिलीप) (२६, रा. नवनाथनगर पंचवटी नाशिक) व अविनाश सूर्यकांत लिंगायत (२२, रा. अमृतधाम पंचवटी नाशिक) हे चोरीच्या दुचाकी विक्र ी करण्यासाठी जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीपुरवडे व पारनेर परिसरात आल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वनिल कोळी, पोलीस हवालदार सुनिल पाटिल, निंबा खैरनार, बी.पी.काळे, राजू गायकवाड, देवीदास माळी, राहूल मोरे आदी पोलिस कर्मचार्यांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. सुरूवातीला संशयितांनी आम्ही श्रीपुरवडे येथील भीमा शंकर मंदिराच्या दर्शनासाठी आलो असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच परिसरात चोरीच्या दुचाकी विक्र ी केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी बजाज प्लेटिना क्र . एमएच ४१, एस. ३६२१, बजाज प्लेटिना क्र . एमएच १८, टी. ३१६५, हिरो होंडा एचएफ डिलक्स क्र . एमएच १५, बीएल३२९२, बजाज पल्सर क्र . एमएच १५, डीई. २३६७, हिरो होंडा स्प्लेंडर क्र मांक नसलेली अशा पाच दुचाकी हस्तगत केल्या. संशयितांनी या आधी किती दुचाकी चोरून विक्र ी केल्या याबाबत तसेच त्यांच्या इतर साथीदारांबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत. दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघड होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.