नाशिक : शहर पोलिसांनी अंबड व मुंबईनाका परिसरातून तडीपार असलेल्या दोघा गुंडांना बेड्या ठोकल्या. संशयित उद्धव अशोक राजगिरे (२०, रा. चुंचाळे शिवार) व फकीरा रमेश बढे (२९, रा. भारतनगर) अशी ताब्यात घेतलेल्या गुंडांची नावे आहेत. उद्धव व फकीरा यांना वर्षभरासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. राजगिरेविरोधात लूटमार, शस्त्र बाळगणे, घरफोडी, चोरी यांसारखे पाच गुन्हे दाखल आहेत. तर बढेविरोधात चोरी, घरफोडी, लूटमार, मुंबई पोलीस कायद्यानुसार १२ गुन्हे दाखल आहेत. या दोघांनाही तडीपार केलेेले असताना विनापरवानगी शहरात फिरताना आढळून आले. राजगिरे यास शनिवारी (दि. २) पहाटेच्या सुमारास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा तडीपार गुंडांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 00:43 IST