नाशिक : शहरातील विनयनगर भागातील ‘एंजेल’ नावाच्या पक्षी, प्राणी, मासेविक्रीच्या दुकानामध्ये नाशिक पश्चिम वनविभागाने छापा मारून वन्यजीव अनुसुची-४मधील दोन भारतीय तारा कासव आणि ४३ भारतीय पोपट मंगळवारी (दि.२०) जप्त केले. दुकानमालक मझहर इस्माइल खान यास वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पक्ष्यांमध्ये भारतीय पोपट आणि वन्यजिवांमध्ये तारा कासव हे दोन्हीही सध्या संकटस्थितीत सापडले असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, अनुसुची-१मधील कासवाची प्रजाती दुकानदाराने ठेवल्याची गुप्त माहिती वनविभाग पश्चिम नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांना मिळाली. त्यानुसार भोगे यांनी साध्या वेशातील एक पथक व त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांच्या नेतृत्वाखाली गणवेशातील दुसरे पथक तयार करून विनयनगर भागात दुपारी सापळा रचला.तस्करीच्या मुळापर्यंत जाणार पोलीसशहरातील पेटविक्रीची दुकाने वनविभागाच्या रडारवर असून, भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षण प्राप्त असलेले वन्यजीव जलचर प्राणी, पक्षी कोणाकडे आढळून आल्यास संबंधितांवर कायेदशीर कारवाईचे आदेश उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिले आहेत. खान याच्याकडे आढळून आलेले भारतीय प्रजातीची दोन कासव, ४३ पोपट हेदेखील अनुसूची-४ मधील आहेत. संशयित खान याने हे पोपट, कासव कोणत्या उद्देशाने बाळगले होते याचा तपास सुरू आहे.
विक्रेत्याकडील दोन तारा कासव, ४३ पोपट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:43 IST
शहरातील विनयनगर भागातील ‘एंजेल’ नावाच्या पक्षी, प्राणी, मासेविक्रीच्या दुकानामध्ये नाशिक पश्चिम वनविभागाने छापा मारून वन्यजीव अनुसुची-४मधील दोन भारतीय तारा कासव आणि ४३ भारतीय पोपट मंगळवारी (दि.२०) जप्त केले. दुकानमालक मझहर इस्माइल खान यास वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
विक्रेत्याकडील दोन तारा कासव, ४३ पोपट जप्त
ठळक मुद्देविक्रेता ताब्यात : विनयनगरच्या ‘एंजेल’ शॉपवर वनविभागाचा छापा