चांदवड : मुंबई आग्रा महामार्गावर मंगरुळ शिवारात मोटार सायकल स्लिप होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले. मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास मालेगाव येथील शेख जाकीर जावेद (२५), व साजिद खान (२७)े हे दोघे मोटार सायकल वरून मालेगाव ते मुंबई येथे जात असताना मंगरूळ शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकी स्लिप झाल्यान हे दोघेही रस्त्यावर पडले. त्यांना चांदवड उपजिल्हा रु ग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले.
मंगरुळ शिवारात दुचाकी अपघातात दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:53 IST