शहरातून रिक्षा चोरणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:16 IST2021-05-21T04:16:19+5:302021-05-21T04:16:19+5:30

एप्रिल महिन्यात मध्यरात्री तौफिक रफिक शेख (रा. आलिशान सोसायटीजवळ वडाळागाव) यांची रिक्षा (एमएच १५ एफयू ५४७८) चोरी झाली होती. ...

Two rickshaw thieves arrested from the city | शहरातून रिक्षा चोरणारे दोघे ताब्यात

शहरातून रिक्षा चोरणारे दोघे ताब्यात

एप्रिल महिन्यात मध्यरात्री तौफिक रफिक शेख (रा. आलिशान सोसायटीजवळ वडाळागाव) यांची रिक्षा (एमएच १५ एफयू ५४७८) चोरी झाली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस शिपाई मुख्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की, रिक्षा चोरी करणारा संशयित मालेगाव येथील आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार, दिलीप मोंढे, विशाल काठे, फय्याज सय्यद, आसिफ तांबोळी, विशाल देवरे यांचे पथक तयार केले. या पथकाने द्वारका बसथांब्याजवळ सापळा रचला. तेथे पथकाला क्रमांक नसलेली रिक्षा उभी असल्याचे आढळले. रिक्षाचालकाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यास पकडून चौकशी केली असता तो सॅम्युअल असल्याचे समजले. त्याने संशयित करीम शेख, हारुण, चुण्णु, शोएब आणि आसिफ यांच्या मदतीने रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. तसेच नानावली येथील अमरधाम रोडवर चोरीची रिक्षा विक्रीसाठी आणल्याचेही सांगितले. त्यानुसार पथकाने तेथून शेख करीम शेख आमीन (२१) व सॅम्युअल सुभाष चांदणे (१९, दोघे रा. मालेगाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांकडूनही चोरीच्या दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Two rickshaw thieves arrested from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.