शिरवाडे फाट्यानजीक झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:24 IST2021-02-16T23:17:45+5:302021-02-17T00:24:08+5:30
शिरवाडे वणी : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी फाट्याजवळ मंगळवारी (दि.१६) सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास मोटरसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

शिरवाडे फाट्यानजीक झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी
शिरवाडे वणी : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी फाट्याजवळ मंगळवारी (दि.१६) सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास मोटरसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या अपघातामध्ये विक्रम उमाजी कोंढाळकर व तेजस्विनी विक्रम कोंढाळकर या दोघांचा समावेश असून, दोघेही धावडी, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील रहिवासी आहेत. हे मोटरसायकलवरून (एम एच ४८ बी आर ०२४३) नाशिकहून मालेगावकडे काही कामानिमित्त जात होते. शिरवाडे फाट्यानजीक मंगळवारी (दि.१६) सकाळी ६.४५ वाजता पाठीमागून येत असलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.
शिरवाडे फाट्यावरील नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी झालेल्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.