दुचाकींची समोरासमोर धडक;एक ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:07 IST2020-03-06T13:06:36+5:302020-03-06T13:07:35+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जख्मी ...

दुचाकींची समोरासमोर धडक;एक ठार, तीन जखमी
वणी : दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जख्मी झाले आहेत. वणी सापुतारा रस्त्यावर हा अपघात दुपारच्या सुमारास घडला. गिरधर तुंगार असे मृताचे नाव आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरगाणाकडून येणारी दुचाकी सीबी झेड क्र मांक एम एच ४१ यु ६५७० घेवून हिरामन धवडया बर्डे येत होता. त्याच्या पाठीमागे साहेबराव उलूशा पवार रा मळगाव कळवण हा होता. दोघे जण वणीकडे जात होते. त्याच सुमारास दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे गिरधर केवळ तुंगार (३२) व रेश्माबाई गिरधर तुंगार हे वणी कडून चौसाळे कडे जात होते. त्यात जोरदार धडक दिल्याने गिरधर केवळ तुंगार व रेश्माबाई गिरधर तुंगार हे खाली कोसळले. त्यांना रु ग्णवाहिकेने वणी ग्रामीण रु ग्णालयात आणले असता गिरधर केवळ तुंगार याला मृत घोषित करण्यात आले. वणी ग्रामीण रु ग्णालयात उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरु होते. वणी सापुतारा रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असुन दरराजे अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी याच मार्गावर ट्र्क व ट्र्कटरचा अपघात झाला होता. त्या अपघातात तिघे जख्मी झाले होते.