इगतपुरी, कोरपगाव कोविडसेंटरला दिले दोन ऑक्सिजन उपकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 17:51 IST2021-04-13T17:48:13+5:302021-04-13T17:51:47+5:30
इगतपुरी : कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लढा लढत असली तरी गंभीर रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. अशा भयानक परिस्थितीत शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याकडून इगतपुरी व कोरपगाव येथील कोविड सेंटरला दोन इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या.

इगतपुरी व कोरपगाव येथील कोविड सेंटरला दोन इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन भेट देतांना हिरामण खोसकर, गोरख बोडके, डॉ. एम. बी. देशमुख, डॉ. स्वरूपा देवरे, निर्मला गायकवाड-पेखळे, डॉ. शेळके, दीपक गायकवाड, वसीम सय्यद, पोपट भागडे आदी.
इगतपुरी : कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लढा लढत असली तरी गंभीर रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. अशा भयानक परिस्थितीत शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याकडून इगतपुरी व कोरपगाव येथील कोविड सेंटरला दोन इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या.
हवेतील ऑक्सिजन शोषून रुग्णांना जीवदान देणाऱ्या स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन कॉन्सीसेटरचे २ यंत्र बोडके यांनी स्वखर्चातून दिले. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते हे दोन्ही यंत्र आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.
या दोन ऑक्सिजन यंत्रांमुळे आता अनेक गंभीर कोरोना रुग्णांना मदत होणार आहे. मंगळवारी (दि.१३) इगतपुरी ग्रामीण रुग्णालय व कोरपगाव कोविड सेंटर येथे ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, डॉ. शेळके, दीपक गायकवाड, वसीम सय्यद, पोपट भागडे आदी उपस्थित होते.